Fri, Jun 05, 2020 06:30होमपेज › Nashik › जो  रस्त्यात येईल त्याला आडवे करा : सहकार राज्यमंत्री 

जो  रस्त्यात येईल त्याला आडवे करा : सहकार राज्यमंत्री 

Published On: Feb 03 2019 1:16AM | Last Updated: Feb 02 2019 5:51PM
जळगाव : प्रतिनिधी

शिवसैनिकांनी युतीच्या भानगडीची वाट पाहू नये, युतीचे काय करायचे ते नेते बघतील. आगामी निवडणूकीच्या कुस्तीसाठी लंगोट बांधून तयार राहा, जो आपल्या रस्त्यात येईल त्याला आडवा करण्याचे आदेशच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिकांना दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जळगाव दौऱ्यांच्या बैठकी दरम्यान ते बोलत होते. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांच्या पूर्वतयारीसाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी शिवसेना पक्षाची बैठक झाली. यावेळी दौऱ्याचे नियोजनाबद्दल मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून शिंगाडा मोर्चा काढण्यात आला नाही आहे. पंढरपूरची सभा ही विभागाची होती त्यापेक्षाही  ही सभा तोडीस तोड झाली पाहिजे असे ते म्हणाले.
ए टी नाना साठी काम करण्याची मानसिकता नव्हती मात्र आदेश आल्यानंतर करावे लागते. ते पावणे पाच लाख मतांनी निवडून आले त्याचे काम बोलते असा खोचक टोला देखील पाटील यांनी मारला. पाचोऱ्याची सभा गाजल्यास राज्यात आपलीच सत्ता येईल असे पाटील म्हणाले. जुन्याच सन्मान आहे जुन्या नी चुना लावू नये, संघटनेकडे सगळे मागतात संघटनेला काय दिले काय देतो याचा सुद्धा विचार व्हावा असा टोलाही पाटील यांनी लगावला. 

तर शिवसेना संपविण्याची भाषा करणार्‍या भाजपाच्या मंत्र्यांना मातीत गाडायची तयारी ठेवा असे आवाहन शिवसेनेचे जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले. राज्यात आपल्यापेक्षा भारतीय जनता पार्टीलाच युतीची गरज अधिक असल्याचे ते म्हणाले. 

राज्यात युतीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. युती होइल की नाही? हे फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाच माहिती आहे. पण युती झाली, तरी जळगावची जागा शिवसेनेकडे घ्यावी अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी यावेळी केली. उध्दव ठाकरेंचा दौरा म्हणजे युतीपेक्षा शिवसेनेची ताकद दाखविण्याची संधी असल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन म्हणाले.