Sat, Dec 05, 2020 23:56होमपेज › Nashik ›  शेवंती, गुलाबाने केले लखपती!

 शेवंती, गुलाबाने केले लखपती!

Published On: Feb 12 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 1:23AMमुकणे : प्रभाकर आवारी

  पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीत भात पिकाचे मोठे उत्पन्न घेतले जाते. शेतीत  वाढलेली स्पर्धा, नकारात्मक दृष्टिकोन, कोसळलेले बाजारभावामुळे शेतीत नकारात्मक वातावरण होेते. मात्र,   तालुक्यातील गोंदे दुमाला येथील  उच्च-शिक्षण घेतलेल्या तरुणाने भरगच्च पगाराची नोकरी सोड़त आधुनिक पद्धतीची शेती केली. अवघ्या 30 गुंठे शेतीत शेवंती व गुलाब आदी फुलांची लागवड करून   आठ महिन्यात 25 लाख रुपये नफा मिळवला आहे. ही यशोगाथा इतर शेतकर्‍यांना प्रेरणादायी ठरणार आहे.

हवामानाचा लहरीपणा,सततची नापीक जमीन  नुकसानीमुळे शेती  व्यवसाय  शेतकर्‍यांना नकोसा झाला आहे. तरुणवर्ग शेतीकडे दुर्लक्ष करत नोकरी व्यवसाय क्षेत्राकडे  वळत असला तरी त्याला गोंदे दुमाला येथील  संतोष नाठे हा सुशिक्षित तरुण अपवाद ठरत आहे.  संतोष नाठे याने उच्च शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरीही मिळवली होती. घरी  वडिलोपार्जित तीन एकर असलेल्या शेतीत फक्त भात व रब्बी हे दोनच पीक वडील घेत. शेतीविषयी पहिल्यापासून आवड़ असल्याने संतोष याने आधुनिक शेतीविषयक माहिती गोळा करुन   30 गुंठे पडीक जागेमध्ये शेडनेटच्या सहाय्याने   टॉपशी ग्रेड या उच्च जातीचा गुलाब लावून  त्यापासून  23 लाख रुपयाचा नफा कमावला आहे.  गुलाब दिल्ली,हैदराबाद,कोलकाता आदि ठिकाणी एक्सपोर्ट करण्यात येत आहे.  दोन वर्ष गुलाबाचे पीक घेतल्यानंतर तिसर्‍या वर्षासाठी शेवंती डेनजीएल या उच्च प्रतीच्या जातीच्या फुलाची  लागवड केली. तीन महिन्यामध्ये फुले विक्रीसाठी तयार झाल्यानंतर आठ ते दहा दिवस कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवून तेच उत्पादित फुले चेन्नई,कलकत्ता आदी ठिकाणी विक्रीसाठी पाठवून त्यातही आठ महिन्यांमध्ये 16 लाख रुपये निव्वळ नफा कमविला. फुलांसाठी संपूर्ण शेड अत्याधुनिक पद्धतीने बनवले असल्यामुळे कमी मेहनत लागल्याचे, संतोष नाठे यांनी सांगितले.

आजची युवा पिढ़ी किंवा जाणकार शेतकरीही हवामानाच्या लहरीपणा व सततच्या कोसळणार्‍या बाजारभावामुळे शेतीव्यसायाकडे न वळता  नोकरीकडे कल वाढू लागला आहे. परंतु, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतीविषयक योग्य मार्गदर्शन घेतल्यास कमी श्रम व जास्त मोबादला शेतीमधून घेता येवू शकतो. त्यासाठी शेतीकडे बघण्याचा नकारात्मक विचार सोडणे गरजेचे आहे.
 - संतोष नाठे, युवा शेतकरी