Tue, May 26, 2020 11:33होमपेज › Nashik › ठोस पुरावे नसताना आकड्यांचा दावा करणे चुकीचे : शरद पवार 

ठोस पुरावे नसताना आकड्यांचा दावा करणे चुकीचे : शरद पवार 

Published On: Mar 04 2019 6:45PM | Last Updated: Mar 04 2019 7:20PM
व्दारका : प्रतिनिधी

शहीद जवानांच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. कारण नसताना याचे राजकारण करु नये असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद पायलट निनाद मांडगवने यांच्या कुटुंबीयांची शरद पवार यांनी भेट घेत सांत्वन केले.   

वाचा : हल्ल्यावेळी ३०० मोबाईल कनेक्शन होते 'ॲक्टीव्ह' 

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, देशात जे काही चालू आहे त्याचे राजकारण करुन अस्थिरता निर्माण करु नये. हल्ल्याच्या घटनेवरुन देशाचे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी २०० अतिरेकी मारल्याचा दावा केला. कोणताही ठोस पुरावा नसताना असा दावा करणे चुकीचे आहे. 

वाचा : 'जखम दहशतवाद्यांना आवाज मात्र काँग्रेसचा'

यावेळी माजी मंत्री आमदार छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे आदी उपस्थित होते.