Tue, Jun 02, 2020 14:15होमपेज › Nashik › शेतीमाल विक्रीची रक्कम आता रोखीनेच, अखेर टीडीएस रद्द 

शेतीमाल विक्रीची रक्कम आता रोखीनेच, अखेर टीडीएस रद्द 

Published On: Sep 17 2019 2:20PM | Last Updated: Sep 17 2019 2:51PM

संग्रहित छायाचित्रलासलगाव (नाशिक) : वार्ताहर 

केंद्र सरकारने १ सप्टेंबरपासून सर्व शेतमालाचे लिलाव होताच शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरुपात न देता बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाचा सर्व स्तरातून विरोध होत आहे. या निर्णयाविरुद्ध लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी शासनाला पत्रव्यवहार करुन या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती केली होती. याबाबत लासलगाव बाजार समितीने खा. भारती पवार आणि पालक मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले होते. यानंतर भारती पवार यांनी लासलगाव बाजार समितीचे विनंती पत्र अर्थमंत्री निर्मला सीताराम यांना दिले होते. या दरम्यान काल (सोमवार) अर्थमंत्री  निर्मला सीताराम यांनी बँकेतून काढण्याच्या रोख रकमेवरील २ टक्के उद्दम कर (टीडीएस) रद्द करण्याबाबतचे ट्वीट केले आहे. 

शासनाने बँकेतून काढण्याच्या रोख रकमेवरील २ टक्के उद्दम कर (टीडीएस) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बाजार समितीतून विक्री झालेल्या शेतमालाचे पैसे रोखीने मिळणार असल्याने सभापती सुवर्णा जगताप यांच्या प्रयत्नला यश आले आहे.