Fri, Jun 05, 2020 17:56होमपेज › Nashik › क्रांतीवीर नाईक संस्थेत सत्ताधारी पॅनलला धक्का

क्रांतीवीर नाईक संस्थेत सत्ताधारी पॅनलला धक्का

Published On: Jul 21 2019 3:06PM | Last Updated: Jul 21 2019 3:06PM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अग्रगण्य अशा क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीत दुपार पर्यंत हाती आलेल्या निकालात विरोधी क्रांतीवीर पॅनलचा 2 महिला तर सत्ताधारी प्रगती पॅनेलला महिला गटातील एक जागा मिळविण्यात यश आले आहे. एकंदरीत सत्ताधारी प्रगती पॅनेल विरूध्द निकाल जाण्याची शक्यता आतापर्यंतच्या मतमोजणीवरून दिसून येत आहे. रात्री 9 वाजेपर्यत सर्व जागांवरील निकाल हाती येण्याची शक्यता आहे. 

संस्थेच्या 29 जागांसाठी शनिवारी सरासरी 79 टक्के मतदान झाले आहे. 8 हजार 692 सभासदांपैकी 6 हजार 846 सभासदांनी मतदानाचा हक्क बजाविला. कोंडाजीमामा आव्हाड व हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी प्रगती पॅनल व माजी मंत्री तुकाराम दिघोळे व पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिवीर पॅनलमध्ये लढत आहे. रविवारी (दि.21) चोपडा लॉन्स येथे सकाळी 8 वाजेपासुन मतमोजणीस सुरूवात झाली आहे. सकाळपासुनच सभासद, उमदेवारांचे समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. याठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून आहे.