Fri, May 29, 2020 08:33होमपेज › Nashik › इगतपुरी स्‍थानकात रूळाला तडे; राज्यराणी एक्सप्रेस अर्धा तास उशिरा(video)

इगतपुरी स्‍थानकात रूळाला तडे (video)

Published On: Jul 23 2019 10:16AM | Last Updated: Jul 23 2019 12:04PM
इगतपुरी : प्रतिनिधी 

मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकावर सकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास मनमाडहून मुंबईकडे जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस प्लॅटफार्म नंबर तीनवर आली असता, रेल्वे रुळाला तडा गेला. ही बाब रेल्वे कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच मुंबईकडे जाणारी मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेस व इतर एक्स्प्रेस प्लॅटफार्म नंबर चार वरुन वळविण्यात आल्या. यामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही, 

मात्र राज्यराणी एक्स्प्रेस प्लॅटफार्म तीनवर अडकली होती. यावेळी अपात्‍कालीन विभागाच्या रेल्वे कर्मचार्‍यांनी या ठिकाणी धाव घेऊन त्यांनी तातडीने रुळाला तात्पुरता जॉइंड देऊन राज्यराणी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना केली. या घटनेमुळे राज्यराणी एक्स्‍प्रेसला मुंबईला जाण्यासाठी अर्धा ते पाऊणतास उशिर झाला. तडा गेलेला रुळ तातडीने बदली करण्याचे काम हाती घेतले असून या कामाला सुमारे दोन तास लागतील अशी माहिती कर्मचार्‍यांनी दिली. विशेष म्हणजे एवढी मोठी घटना झाली असताना इगतपुरीचे स्टेशन मास्टर प्रेमचंद आर्या व मोठे अधिकारी अनुपस्‍थित असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.