Wed, Jun 03, 2020 08:53होमपेज › Nashik › जळगाव : निंबोलात विजया बँकेवर दरोडा; गोळीबारात मॅनेजर ठार 

जळगाव : निंबोलात विजया बँकेवर दरोडा; गोळीबारात मॅनेजर ठार 

Published On: Jun 18 2019 5:15PM | Last Updated: Jun 18 2019 5:22PM
जळगाव : प्रतिनिधी

रावेर तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेवर आज, मंगळवार (दि.१८) दुपारी भरदिवसा अज्ञात दोन हेल्मेटधारी दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी या दरोडेखोरांनी बँक मॅनेजरच्या छातीत गोळी झाडून पळ काढला. यात बँक मॅनेजर करण नेगे यांचा मृत्यू झाला. या थरारक घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. होंडा शाईन या दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी अवघ्या काही मिनिटातच हा दरोडा टाकून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांचा शोध सुरु केला आहे. तर, पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे.

उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्स येथे शुक्रवारी (दि.14) सकाळी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना ताजी असतानाच आज ही दुसरी घटना घडली. या घटनेमुळे नाशिक शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. 

वाचा : नाशिक : दरोडेखोरांच्या गोळीबारात १ ठार (Video)

विजया बँकेच्या शाखेवर सव्वादोन च्या सुमारास दोन हेल्मेटधारी चोरटयांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी चोरटयांना बँक अधिकारी करण नेगे यांनी विरोध केला असता त्यांच्या छातीत बंदूकीच्या दोन गोळया झाडल्या. याचवेळी इतर कर्मचाऱ्यांनी बँकेमध्ये असणारा सायरन वाजवल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या सायरनचा आवाज ऐकताच मसाकाचे व्हा. चेअरमन भागवत पाटील, मोहन पाटील, पं.स. सदस्य जितू पाटील यांनी बॅकेकडे धाव घेतली. तर जखमी मॅनेजर करण नेगे यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी निभोरा पोलिस स्टेशनचे सपोनि प्रकाश वानखेडे त्यांच्या सहकाऱ्यासोबत बँकेत दाखल झाले. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे.