Tue, May 26, 2020 13:22होमपेज › Nashik › नांदगाव परिसरात सहा ठिकाणी घरफोड्‍या

नांदगाव परिसरात सहा ठिकाणी घरफोड्‍या

Published On: Mar 03 2019 5:59PM | Last Updated: Mar 03 2019 5:59PM
नांदगाव : प्रतिनिधी 

नांदगाव शहरातील सुयोग कॉलनीत (दि. २) रोजी मध्यरात्री चोरट्यांनी सहा ठिकाणी घरफोड्या केल्‍या आहेत. हजारो रूपयांचा अैवज चोरट्‍यांनी लंपास केला आहे. 

शहरातील सुयोग कॉलनीतील ग्यानेश्वर सोपान कदम, शरद दादा शेवाळे, रवींद्र त्रंबक जाधव, एस. पी. पाटील, जिजाबाई धर्माराज बोरसे, रामदास पाटील  यांच्‍यासह आदी सहा ठिकाणी चोरांनी मध्यरात्री चोरी केली. घराची कुलुपे तसेच कपाटे तोडून रोख रक्‍कम, सोने व चांदीचे दागिने चोरुन पोबारा केला. 

मागील चार दिवसापूर्वी तालुक्यातील साकोरा, भालुर, लक्ष्मीनगर परिसरात घराची कुलुप तोडून लाखो रुपयांची चोरी झाली होती. त्या चोरीचा तपास लागण्या आगोदर नांदगाव शहरातील सुयोग कॉलनीत हजारो रुपयांची चोरी झाली.  या घटनेचा नांदगाव पोलिस तपास करत आहेत.