Mon, Jun 01, 2020 07:37होमपेज › Nashik › पाथर्डीगाव येथे तरूणाचा खून; पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय 

पाथर्डीगाव येथे तरूणाचा खून; पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय 

Published On: Feb 20 2019 12:43AM | Last Updated: Feb 20 2019 12:43AM
पाथर्डीगाव : प्रतिनिधी 

पाथर्डीगाव येथे रितेश पाईकराव या तरूणाचा रात्री खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत अधिक तपास इंदिरानगर पोलिस करत आहे.

घटना स्थळी पोलीस उप आयुक्त श्रीकृष्ण कोकाटे,इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण न्याहळदे दाखल झाले आहेत. रितेश अनिल पाईकराव (वय १९)  राहणार सुकदेव नगर पाथर्डी गांव याचे जुन्या भांडणाची कुरापत कढून खून झाला असल्यचा पोलीसांना संशय आहे.  सदर खुन ९.३०  ते ९.४५ च्या दरम्यान झाला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.