Wed, Jun 03, 2020 08:50होमपेज › Nashik › जळगाव घरकुल घोटाळा; निकाल लांबणीवर  

जळगाव घरकुल घोटाळा; निकाल लांबणीवर  

Published On: Jun 27 2019 12:52PM | Last Updated: Jun 27 2019 12:52PM
धुळे : प्रतिनिधी 

जळगाव घरकुल घोटाळा खटल्यात आज (गुरूवार) पुन्हा तारीख देण्यात आली आहे. या खटल्याचे न्यायाधीश रजेवर असल्याने निकालाची 15 जुलै ही तारीख देण्यात आली आहे, जळगाव येथे घरकुल योजना राबविण्यात आली होती, या कामात अनियमितता आढळण्याने तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने माजी मंत्री सुरेश जैन, तत्कालीन मंत्री गुलाबराव देवकर, यांच्यासह आजी व माजी नागरसेवकांसह 52 जणांवर गुन्हा दाखल झाला. 

यातील 4 जण मयत झाल्याने 48 जनांविरोधात खटला दाखल करण्यात आला. दरम्यान एका अर्जावर निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने हा खटला जळगाव वरून धुळे येथील न्यायालयात वर्ग करण्यात आला. त्यासाठी विशेष न्यायालय नियुक्त करण्यात आले. या खटल्यात सर्व वकिलांचे युक्तिवाद झाले असून हा खटला निकालावर आहे. पण गेल्या दोन तारखांना न्यायाधीश रजेवर असल्याने निकाल जाहीर झाला नाही. आज देखील न्यायाधीश सृष्टी नीलकंठ रजेवर असल्याने हे कामकाज न्यायाधीश उगले यांच्या समोर चालविण्यात आले. यावेळी 15 जुलै ही तारीख देण्यात आली आहे.