Fri, Jul 10, 2020 16:29होमपेज › Nashik › रावणदहनास गोदाकाठी जनसागर

रावणदहनास गोदाकाठी जनसागर

Last Updated: Oct 08 2019 11:31PM

नाशिक : गोदाघाटावर 35 फुटी रावणदहनप्रसंगी उपस्थित जनसागर.(छाया : हेमंत घोरपडे)पंचवटी : वार्ताहर

‘सियावर रामचंद्र की जय..धर्म कीजय हो..अधर्म का नाश..हो’ अशा जयघोषात रामकुंड येथे 35 फूट रावणदहन करण्यात आले.

दसर्‍याच्या (विजया दशमी) मुहूर्तावर विजयाचे प्रतीक म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील श्री व्यंकटेश बालाजी भगवान नवरात्रोत्सव, चतु:संप्रदाय आखाडा ट्रस्ट यांच्यावतीने रावणदहनाचा कार्यक्रम पारंपरिक उत्साहात पार पडला. रावणाच्या पुतळ्याला अग्निडाग देताच भाविकांनी ‘सियावर रामचंद्र की जय’चा घोष केला. 

मंगळवारी (दि.8) विजयादशमीला (दसरा) सायंकाळी 7.30 वाजता श्रीराम विजय, रावणदहन, आतषबाजी व श्रीची विशेषारती  झाली . रावणदहन व श्रीराम विजय हा कार्यक्रम चतु :संप्रदाय आखाडा यांच्या वतीने नाशिकमध्ये सर्वात प्रथम सुरू करण्यात आला आहे. या उत्सवाला मोठी परंपरा देखील आहे. रामकुंडाजवळील मैदानात सुमारे 35 फूट उंचीचा रावणाचा पुतळा चतु:संप्रदाय आखाडा ट्रस्टच्या वतीने बनविण्यात आला होता. संध्याकाळी 6 वाजता श्रीराम, लक्ष्मण, मारुती, वानरसेना त्याचप्रमाणे रावण, कुंभकर्ण, बिभीषण, वानर व राक्षससेना यांची पंचवटी परिसरातून मिरवणूक काढून सायंकाळी 7 वाजता रामकुंडाजवळील मोकळ्या मैदानात आगमन झाले. त्यानंतर वानरसेना व राक्षस सेना यांच्यात युद्ध सुरू झाले. यावेळी संगमनेरवाला यांच्यावतीने नयनरम्य अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

या आतषबाजीने आलेल्या भाविक, भक्त व नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यानंतर मारुती व इंद्रजीत यांचे युद्ध झाले. रावण, कुंभकर्ण, मेघनाद यांच्याबरोबर श्रीराम व लक्ष्मण यांचे युद्ध झाले. सर्व राक्षसांचा वध करून शेवटी 35 फुटी रावणाच्या पुतळ्यास अग्निडाग देण्यात आला. दारूगोळा भरलेल्या रावणास अग्निडाग दिल्यानंतर उपस्थित जनसमुदायांनी ‘सियावर रामचंद्र की जय’चा उद्घोष केला.

यावेळी श्रीरामाच्या भूमिकेत अभिषेक आढळकर, लक्ष्मणाच्या भूमिकेत रोहित कोठावदे , मारुतीच्या भूमिकेत विवेकानंद घोडके, रावणाच्या भूमिकेत छोटूराम आढळकर, बिभीषणच्या भूमिकेत भाग्येश देशपांडे, कुंभकर्णाच्या भूमिकेत आदित्य शिंदे, इंद्रजीतच्या भूमिकेत कुमार आढळकर यांनी भूमिका साकारल्या तर रावणाचा पुतळा हा चंदन भोईर आणि निनाद भोईर यांनी बनविला होता. 

कार्यक्रमासाठी आमदार बाळासाहेब सानप, पंचवटी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. डी. पाटील, पोलीस निरीक्षक अशोक साखरे, महंत भक्तिचरणदास महाराज, स्वामी संविदानंद सरस्वती, देवांग जानी, अशोक गरड, पद्माकर पाटील, कृष्णकुमार नेरकर आदींसह प्रतिष्ठित मान्यवर आणि नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच, रामकुंडाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.  महोत्सवाची परंपरा ही महंत बिहारीदासजी महाराज यांनी सुरू करून पुढे महंत दिनबंधुदासजी महाराज व आता त्यांचे शिष्य महंत श्रीकृष्णचरणदासजी महाराज चालवीत आहे. नागरिक व भाविक भक्तांनी दिलेल्या सहकार्याबद्दल महंत श्रीकृष्णचरणदासजी महाराज यांनी सर्व नागरिक व भक्तांचे क्षेम कुशल चिंतिले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवि आवरकर, सागर बैरागी, महेश गंधे, घनश्याम गंधे, नीलेश भोरे, सागर कापसे, आकाश बैरागी, वैभव आवारकर, आदित्य शिंदे, कपिल भोरे, सतीश देशपांडे, सुनील देशपांडे, नंदकुमार बैरागी, कृष्णकुमार नेरकर, सागर कापसे, घनश्याम गंधे, कैलास यंदे, दिलीप पवार, ओमकार बैरागी, दादू शिंदे, नाना साठे, राज शर्मा, सोनू आढलकर, आकाश बैरागी, राजू उदाशी, वाघ, संतोष घोडे, कुमार आढलकर, दीपक अग्रहरी, मनोज अग्रहरी, सत्यम वशिष्ठ यांनी परिश्रम घेतले.

श्रीकृष्णचरणदास महाराजांचा गौरव 

नाशिकमध्ये सुरू करण्यात आलेला रावणदहन कार्यक्रम आजही अखंडितपणाने सुरू ठेवल्याने महंत श्रीकृष्णचरणदासजी महाराज यांना विरक्त साधू समाज मंडळाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गांधीनगरला ६० फुटी पुतळा

नाशिकरोड : वार्ताहर
गांधीनगर रामलीला उत्सवाचा समारोप ६० फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून करण्यात आला. यावेळी आकर्षक  फटाक्यांच्या आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

रामलीलेत श्रीरामाची वानरसेना आणि रावणाच्या राक्षस सेनेतील युद्ध सादर करण्यात आले. त्यानंतर श्रीरामाच्या अग्निबाणाने रावणाच्या पुतळ्याचे दहन झाले. यावेळी आ. देवयानी फरांदे, अ‍ॅड.जयंत जायभावे, रितू अग्रवाल, डॉ. संजय कदम, प्रेसचे व्यवस्थापक रामदयाल शरेरा, प्रेस कामगार संघटनेचे रवि आवारकर, मनोहर बोराडे, विजय वागले, रामलीला समितीचे अध्यक्ष कपिल शर्मा, पप्पू कोहिली, नगरसेवक अनिल ताजनपुरे, नगरसेविका सुषमा पगारे, रवि पगारे, प्रदीप भुजबळ, जयंत जाधव, अरविंद चौदा, गुरुदयाल वर्मा उपस्थित होते. दिग्दर्शक हरिष परदेशी, सहायक दिग्दर्शक संजय लोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश खैरनार (राम), प्रदीप भुजबळ (लक्ष्मण), शुभांगी ओढेकर (सीता), ज्ञानेश्‍वर कुंडरिया (रावण), सुभाष वाणी (बिभीषण), सुनील मोदियानी (कुंभकर्ण), सुनील साधवानी, सुमित पवार, रमाकांत वाघमारे, राजू फुलसुंदर आदी प्रमुख कलाकारांनी श्रोत्यांची वाहवा मिळवली. यावेळी सहायक आयुक्‍त ईश्‍वर वसावे, वरिष्ठ निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रामलीलेसाठी संगमनेरचे जमीर फायर वर्क्सने फटाके पुरवले. आनंद ट्रान्स्पोर्ट, बिल्डर नरेश कारडा, मंडपासाठी सुहास गिरी, महाराज बिर्मानी आदींनी सहकार्य केले.