Fri, Jul 10, 2020 16:26होमपेज › Nashik › नाशिक : पोलिस कर्मचाऱ्यानेच केला सावत्र मुलांवर गोळीबार; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू (video)

नाशिक : पोलिस कर्मचाऱ्यानेच केला सावत्र मुलांवर गोळीबार; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू (video)

Published On: Jun 21 2019 5:23PM | Last Updated: Jun 21 2019 7:40PM
पंचवटी : वार्ताहर

शहरातील उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यानेच आपल्या सावत्र मुलांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात दोन्ही मुले जखमी झाली. यामध्ये दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. सोनू नंदकिशोर चिखलकर (वय २५) आणि शुभम नंदकिशोर चिखलकर (वय २२) अशी मृत मुलांची नावे आहेत. आज (दि.२१) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घरगुती कारणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पेठरोडवरील अश्वमेध नगर येथे राजमंदिर इमारतीत उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक संजय अंबादास भोये यांच्यात आणि मुलांमध्ये  भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की भोये यांनी आपल्या सावत्र मुलांवर गोळीबार करत सर्व्हिस रिव्हॉल्वरने तीन गोळ्या झाडल्या. यावेळी मुले बाथरूममध्ये जावून लपली. मात्र या गोळीबारात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार मृत सोनू चिखलकर हा नौदलात कार्यरत होता. तर शुभम नाशिकमधील एका खासगी कंपनीत नोकरीला असल्याचे समजते.