Sun, Jun 07, 2020 11:58होमपेज › Nashik › धुळ्यात लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

धुळ्यात लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Published On: Sep 18 2019 1:49AM | Last Updated: Sep 17 2019 10:30PM
धुळे :

धुळ्यातील अवैध धंदे नष्ट करण्याचे आदेश पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी पोलिसांना दिले असतानाच सट्ट्याचा धंदा सुरू करून त्याला आश्रय देण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारणार्‍या पोेलीस कर्मचार्‍यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे पोलीसच अवैध व्यवसायाला आश्रय देत असल्याची बाब उघड झाली आहे.

येथील पश्‍चिम देवपूर पोलीस ठाण्यातील हवालदार छोटू बोरसे असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. धुळे शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणार अवैध धंदे सुरू होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. यासाठी पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांनी धुळ्यात आढावा बैठकीत अवैध धंदे पूर्णपणे नष्ट करण्याचे आदेश दिले. या व्यावसायिकांबरोबर साटेलोटे करणार्‍या कुणालाही सोडणार नसल्याचा सज्जड दमदेखील त्यांनी पोलिसांना दिला होता. असे असतानाच थेट सट्टा व्यवसायाला आश्रय देण्याच्या मोबदल्यात हप्ता स्वीकारल्याचा प्रकार उघड झाला आहे.  नगाव परिसरात सट्ट्याचा धंदा सुरू करण्यासाठी तक्रारदार तरुणाने देवपूर पश्‍चिम पोलीस ठाण्यात संबंधितांबरोबर संपर्क केला. यासाठी बोरसे यांनी 30 हजारांच्या लाचेची मागणी केली होती.