Tue, Nov 19, 2019 00:51होमपेज › Nashik › यशस्वी जीवनासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज

यशस्वी जीवनासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज

Published On: Aug 20 2019 1:46AM | Last Updated: Aug 19 2019 11:05PM
नाशिक : प्रतिनिधी

प्रतिकूल परिस्थितीतही संकटावर मात केली पाहिजे. जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश मिळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे -पाटील यांनी केलेे.

रावसाहेब थोरात सभागृहात पार पडलेल्या मविप्र संस्थेच्या ‘समाज दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर सैन्यदलातील निवृत्त लेफ्ट. जनरल राजेंद्र निंभोरकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिक बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, भाऊसाहेब खातळे, सचिन पिंगळे, हेमंत वाजे, दत्तात्रय पाटील, डॉ.विश्राम निकम, नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे आदी उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील महापुरुषांनी अनेक आदर्श घालून दिले आहे. या आदर्शावर मार्गक्रमण करण्याचा सल्ला नांगरे-पाटील यांनी दिला. प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. डॉ. डी. पी. पवार यांनी सूत्रसंचालन तर डॉ. सुनील ढिकले यांनी आभार मानले.

सर्जिकल स्ट्राइकवर शंका घेणे चुकीचे

उरी सर्जिकल स्ट्राइकद्वारे भारतीय सैन्याने पाकला चोख उत्तर दिले होते. एकही जवान न गमवता 82 दहशतवादी ठार केले तर बालाकोट एअर स्ट्राइकच्या माध्यमातून रावळपिंडीपर्यंत पोहोचणे सहज शक्य असल्याचा इशारा भारतीय सैन्याने दिला होता. मात्र, यामध्ये किती दहशतवादी मारले गेले याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. सर्जिकल आणि एअर स्ट्राइकवर शंका उपस्थित करणे चुकीचे असल्याचे मत सेवानिवृत्त लेफ्ट. जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले.