Sun, Jun 07, 2020 10:44होमपेज › Nashik › तिला देऊन जलम सांगा, कुठं झाला नफा?

तिला देऊन जलम सांगा, कुठं झाला नफा?

Published On: Jul 11 2019 1:37AM | Last Updated: Jul 10 2019 10:52PM
निफाड : वार्ताहर

येथील माणकेश्वर वाचनालय  शतक महोत्सव साजरा करत आहे. यानिमित्ताने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कविसंमेलन पार पडले.  त्यात कवी राजेंद्र सोमवंशी, तुकाराम धांडे, रमजान मुल्ला, विष्णू थोरे, स्वाती गायखे, अरुण म्हात्रे, श्रीनिवास मस्के आदी नामवंत कवींनी गाव, नाती, बाई, आई आणि वेदना आदी मर्मभेदी कवितांच्या माध्यमातून रसिकांना भारावले.

‘बाईचा जलम जसा गाजराचा वाफा तिला देऊन जलम सांगा कुठं झाला नफा?’ ही कविता विशेष दाद घेऊन गेली. 

प्रारंभी माणकेश्वर वाचनालयाच्या वतीने कवींचा सत्कार करण्यात आला. मधुकर शेलार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनिल कुंदे, शिवाजी ढेपले, संजय आहेर, नंदलाल बाफना, कृष्णा नागरे, वाचनालयाचे अध्यक्ष दत्ताकाका उगावकर,  उपाध्यक्षा सुजाता तनपुरे, चिटणीस बाळासाहेब कापसे, सहचिटणीस डॉ. मेघा जंगम, संचालक मधुकर शेलार, चंद्रकांत पानसरे, राजेंद्र खालकर, अ‍ॅड प्रवीण ठाकरे, मालती वाघावकर, सुनील कुमावत, सुनील निकाळे, तनविर राजे, राहुल दवते, राहुल नागरे, सुहास सुरळीकर, ग्रंथमित्र बाळासाहेब खालकर, नितीन बनसोडे, मुरलीधर निर्‍हाळी, मंगला डरंगे आदी उपस्थित होते.