Fri, Jul 10, 2020 07:57होमपेज › Nashik › जळगाव : पाचोरा लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील अपात्र

जळगाव : पाचोरा लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील अपात्र

Published On: Jan 24 2019 7:44PM | Last Updated: Jan 24 2019 7:44PM
जळगाव : प्रतिनिधी

पाचोरा येथील नगरपरिषदेची निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेली होती, यावेळी अनुसूचित जाती या राखीव संवर्गातून शिवसेनेचे संजय नथालाल गोहील हे निवडून आले होते. निवडणुकीनंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र न दिल्यामुळे २३ रोजी जिल्हाधिकारी किशोरराजे निबाळकर यांनी अपात्र ठरविले. या निकालामुळे पाचोरा मतदार संघात खळबळ उडाली आहे.

पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडून संजय गोहील तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजय भास्कर अहिरे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. सदरची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने हमीपत्र लिहून दिले होते. माञ लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर गोहील निवडून आले होते. मात्र, संजय गोहील यांनी सहा महिन्याच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे अजय भास्कर अहिरे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे ७  सप्टेंबर २०१८ रोजी तक्रार दाखल केली.

त्यावर सुनावणी घेऊन समोर आलेले दस्तऐवज व पुरावे पाहता सहा महिन्याच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे गोहील यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावरून अपात्र ठरविण्यात येत आहे असा निर्णय जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर जळगाव यांनी दिला.