Tue, Jun 02, 2020 14:49होमपेज › Nashik › नाशिक : सटाण्यात कांदा लिलाव सुरू, संभ्रम कायम 

नाशिक : सटाण्यात कांदा लिलाव सुरू, संभ्रम कायम 

Published On: Oct 01 2019 1:38PM | Last Updated: Oct 01 2019 1:11PM

संग्रहित छायाचित्रसटाणा : प्रतिनिधी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि.१) सकाळी कांदा लिलाव सुरळीत सुरू झाला. नेहमीपेक्षा यावेळी कांद्याची आवक वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत दुपारपर्यंत जवळपास साडेसातशे वाहने कांदा लिलावासाठी दाखल झाली होती. व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे सकाळपासूनच कांद्याच्या लिलावास सुरुवात केली. परंतु कांद्याची आवक झालेल्या सगळ्या मालाची खरेदी करण्यात येईल का? याबाबत मात्र संभ्रम कायम आहे.

शासनाने घातलेल्या निर्बंधानुसार मालाची खरेदी झाल्यानंतर दुपारी व्यापारी अतिरिक्त खरेदी करतील का? हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे बाजार समिती व शेतकऱ्यांच्या दबावापोटी व्यापाऱ्यांनी सुरू केलेले लिलाव सायंकाळपर्यंत सुरळीत सुरू राहतील का? हा प्रश्नही कायम आहे. मंगळवारी (दि.१) येथे कांद्याला सर्वोच्च तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.