Sat, Apr 10, 2021 19:47
नंदुरबार: फोटो व्हायरल करणार्‍या तरुणावर कटरने वार

Last Updated: Mar 18 2021 4:56PM

नंदुरबार  : पुढारी वृत्‍तसेवा

बिडी ओढतानाचा फोटो व्‍हायरल केल्याच्या रागातून तीन जणांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच त्‍याच्‍यावर कटरने वार करून जखमी केल्‍याची खळबळजनक घटना शहादा येथे घडली. नवेद अंजुम हकीम (वय २१) असे जखमीचे नाव आहे.

अधिक वाचा : जुन्या गाडीच्या आरसी नुतनीकरणासाठी लागणार आठपट जास्त शूल्क!

हकीम दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मोहम्मद कैफ याचा बिडी ओढतानाचा फोटो व्हॉटसअप ग्रुपवर व्‍हायरल करण्‍यात आला होता. म्हणून मोहम्मद कैफ रहीम कुरेशी, अतीफ रहीम कुरेशी आणि रहीम हाजी मोहम्मद कुरेशी (रा- जुना पाडळदा रोड कुरेशी मोहल्ला शहादा) यांनी 17 मार्च रोजी दुपारी 3 वाजता नवेद याला जाब विचारत मारहाण केली. कटरने पोटावर मारुन जखमी केले. तसेच जीवे मारण्‍याची धमकी दिली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.