Fri, May 07, 2021 18:11होमपेज › Nashik › सिन्नर : अपघातात मुख्यमंत्र्यांची मेहुणी जखमी

सिन्नर : अपघातात मुख्यमंत्र्यांची मेहुणी जखमी

Last Updated: Jan 15 2020 2:10AM
नाशिक : प्रतिनिधी

सिन्नर जवळील पांगरी गावाजवळ झालेल्या अपघातात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मेहुणी अमृता श्रृंगारपुरे या जखमी झाल्या. तर अजय विश्वनाथ कारंडे यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी 7 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. हे सर्वजण ठाणे येथून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. ठाण्याला परतताना हा अपघात झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झायलो गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटून ती उलटली. या गाडीतून अमृता श्रृंगारपुरे प्रवास करत होत्या. त्यांच्यासह मीना कारंडे, मनिषा मिश्रा, अभिषेक सिंग जखमी झाले. त्यांना नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप शिंदे करत आहेत.