Tue, Sep 22, 2020 10:33होमपेज › Nashik › जळगाव : तिसऱ्या दिवशीही कोरोनाचा कहर सुरूच, १३ हजाराचा आकडा पार   

जळगाव : तिसऱ्या दिवशीही कोरोनाचा कहर सुरूच, १३ हजाराचा आकडा पार   

Last Updated: Aug 07 2020 10:50AM

संग्रहित छायाचित्रजळगाव : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही कोरोनाचा कहर सुरूच आहे. जिल्ह्यात ३२१ कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्याने कोरोना रुग्णांचा १३ हजाराचा आकडा पार केला आहे. काल जळगाव शहरात एकही रुग्ण दगावला नाही असे असले तरी जिल्ह्यात ८ जणांचा कोरोनाने मृत्यू  झाला आहे. 

मुक्ताईनगर येथे नवे ३४ रुग्ण सापडले आहेत. याठिकाणी एकही रुग्ण आढळला नव्हता. तर जळगाव शहरात काल सर्वाधिक रुग्ण ७९ सापडले. तसेच जामनेर येथे आणखी १५ रुग्ण आढळले. यामुळे माजी आरोग्य मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात आजपर्यंत ९३० रुग्ण आढळले आहेत. चाळीसगाव, भडगाव याठिकाणी प्रत्येकी २ असे रुग्ण तर जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल, रावेर याठिकाणी प्रत्येकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

कोरोनाच्या विळख्यातून काल २०० रुग्ण बरे झाले असून जिल्ह्यात एकूण ९१४५ रुग्ण आजपर्यंत बरे झाले आहे. तसेच जळगाव शहर ७९ (३२९९), जळगाव ग्रामीण १२ (६४९), भुसावळ १९ (९८०), अमळनेर १५ (८७४), चोपडा २० (९४०), पाचोरा १८ (५४४)  भडगाव ० (५४४), धरणगाव १८ (६०२), यावल ९ (५००) , एरंडोल ५१ (६५१) , जामनेर  १५ (९३०) , रावेर ६ (७३३)  , पारोळा ३ (५१६ ),  चाळीसगाव १८ (६११) , मुक्ताईनगर ३४ (४१३) बोदवड १ (२५२),  दुसऱ्या जिल्ह्यातील १ (४९) असे एकूण  कोरोनाबाधित ३२१ (१३०८७ ) आहे.

 "