Fri, Jul 10, 2020 09:30
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › पोषण आहारातून विषबाधा; मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख निंलबित

पोषण आहारातून विषबाधा; मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख निंलबित

Published On: Jul 26 2019 8:49PM | Last Updated: Jul 26 2019 8:52PM
जळगाव : प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील कन्हाळे गावात ९ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाली होती. या संदर्भात जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी पोषण आहाराचे नमुने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मस्कर यांच्याकडे दिले. यावेळी मस्कर यांनी या चौकशीसाठी पथक तयार करुन अहवाल मागविला होता. या अहवालानुसार आज जि.प.प्राथमिक विद्या मंदीर कन्हाळे या शाळेतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमख यांचे निंलबन तर पोषण अधिक्षकांच्या बदलीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी काढले.  

जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदीर कन्हाळे ता. भुसावळ या शाळेत गेल्या काही दिवसापूर्वी ९ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाली होती. ही माहिती जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांना समजताच त्यांनी तत्काळ घटनावर जावून पाहणी केली. यावेळी सावकारे यांना शाळेत अत्यंत नित्कृष्ट दर्जाचा पोषण आहार आढळून आला. ते नमूने घेत त्यांनी थेट सीईओंकडे तक्रार केली. त्यानुसार सीईओंनी गटशिक्षण अधिकारी भुसावळ येथील १ व शालेय पोषण अधिक्षक येथील १, जिल्हा परिषद जळगाव येथील १ अशा तीन पथकांना चौकशी समिती स्थापन केली होती. 

यानुसार आज, भुसावळ तालुक्यातील ४२ शाळामधील २० शाळांचे पोषण आहार नित्कृष्ट दर्जाचा आढळून आला होता. यात कन्हाळे जि.प.शाळेतील मुख्याध्यापक कुंदा ओंकार पाटील, केंद्रप्रमुख रविंद्र तिडके या दोघांना निलंबनाचे आदेश तर शालेय पोषण अधिक्षक सुमित्र अहिरे यांच्या बदलीचे आदेश जारी केले. तर २० शाळेतील मुख्याध्यापक, केद्रप्रमुख व शालेय पोषण आहार अधिक्षक यांना नोटीस देवून त्यांना खुलासा सादर करुन शिस्तभंगाची कारवाई सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांनी केली.