Fri, Dec 04, 2020 04:58होमपेज › Nashik › वृत्तपत्र विक्रेत्यांचे उद्या आंदोलन

वृत्तपत्र विक्रेत्यांचे उद्या आंदोलन

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 03 2017 11:35PM

बुकमार्क करा

नाशिक : विशेष प्रतिनिधी 

कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी 19 जुलै 2017 रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत 15 ऑगस्टपर्यंत वृतपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र, आजपर्यंत कल्याणकारी मंडळाविषयी कोणताही निर्णय न झाल्याने मंडळ स्थापन करावे यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील जिल्हा संघटना उद्या (दि. 5) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत.

स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करणे, गटई कामगाराप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, शासकीय घरकुल योजनेत वृतपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा  ठेवावा, एसटी प्रवासासाठी राज्य संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी यांना मोफत सेवा मिळावी, शासकीय विश्रामगृह राज्य संघटनेच्या लेटरहेडवर बैठकीस सवलतीच्या दरात मिळावे, विधान परिषदेवर असंघटित कामगारांचा प्रतिनिधी घेण्यात यावा आदी  मागण्यांसाठी  हे आंदोलन केले जाणार आहे. 

राज्य संघटनेचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, गोपाल चौधरी जळगाव, अण्णा जगताप, दिनेश उक्के, श्रीराम खत्री, भाऊसाहेब सूर्यवंशी, शिवगौंडा खोत, अशोक डहाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.

नाशिकरोडचे विके्रते करणार निदर्शने

नाशिकरोड येथील वृत्तपत्रविक्रेत्यांतर्फे मंगळवारी (ता.5) दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकरोड वृत्तपत्रविक्रेता सेवाभावी संस्ेचे अध्यक्ष सुनील मगर, उपाध्यक्ष महेश कुले, सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी दिली.