Sat, Oct 24, 2020 22:53होमपेज › Nashik › चैतन्यमय नवरात्रोत्सवास प्रारंभ

चैतन्यमय नवरात्रोत्सवास प्रारंभ

Last Updated: Oct 18 2020 1:14AM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चैतन्यमय, मंगलमय वातावरणात शनिवारी नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी येथील श्री सप्तशृंगी, नाशिकचे ग्रामदैवत कालिकामाता, चांदवड येथील रेणुकामाता मंदिरात सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी घटस्थापना करण्यात आली. यानंतर शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

शहर व जिल्ह्यातील विविध देव-देवतांच्या मंदिरांत आणि घरोघरी घटस्थापना करण्यात आली. कोरोनाच्या संकटापासून सर्वांचे रक्षण करण्याबरोबरच या संकटातून मुक्त  करण्याची प्रार्थना भाविकांनी केली.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळांबरोबरच मंदिरे दर्शनासाठी बंद राहणार असल्याने यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव लोकसहभागाशिवाय होत आहे. यामुळे मंदिरांमध्ये शासनाने लागू केलेल्या सुरक्षिततेचे नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच धार्मिक सोहळे पारंपरिक पद्धतीने सुरू झाले आहेत. दरम्यान, मंदिरांचे परिसर नेत्रदीपक, विद्युत रोषणाईने उजळविण्यात आले आहेत.

 "