Sun, Aug 09, 2020 11:38होमपेज › Nashik › नाशिक : मानवी तस्करीप्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा 

नाशिकचे ‘सेक्स रॅकेट’ उघडकीस; तीघांना अटक

Published On: Dec 14 2017 5:55PM | Last Updated: Dec 14 2017 5:55PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

भारतात फिरण्यासह नोकरीचे आमीष दाखवून बांगलादेशी मुलींची वेश्याव्यवसायासाठी विक्री केल्‍याची घटना समोर आली आहे. या  प्रकरणी सात संशयितांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात अपहरण, मानवी तस्करी करणे, बलात्कार, पीटा कायद्यान्वये विविध गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी दोन युवकांसह एका महिलेस अटक केली आहे. 

विशाल नंदकिशोर गंगावणे, सोनु नरहरी देशमुख आणि मंगल उर्फ नानी नंदकिशोर गंगावणे (तिघे रा. सिन्नर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. इतर चार संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. संशयितांमध्ये बांगलादेशमधील पीडित मुलीच्या मावशीचाही सहभाग आहे.