Wed, Dec 02, 2020 09:18होमपेज › Nashik › नाशिक : निफाड तालुक्यातील ३६ गावांत कोरोनाचा शिरकाव 

नाशिक : निफाड तालुक्यातील ३६ गावांत कोरोनाचा शिरकाव 

Last Updated: Jul 14 2020 9:41AM

संग्रहित छायाचित्रनिफाड (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सोमवार (ता.१३) अखेर २४२ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी १३६ रुग्ण  कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर सध्या ८९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यात कोरोना संसर्गामुळे १८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी चेतन काळे यांनी दिली आहे.

अधिक वाचा :  कोरोनाबाधितांचा वाढता आलेख कायम!

निफाड तालुक्यात कोरोना संसर्गाचा कहर सुरुच आहे. तालुक्यात ज्या भागात कोरोना रुग्ण आढळून येतो ते गाव बंद ठेवले जाते आरोग्य यंत्रणा कोरोना मुक्तीसाठी‌ लढा देत आहे. मात्र अनेक गावांत कोरोनाबाबतच्या नियमांचे नागरिकांकडून पालन होत नाही. मास्क न वापरता  फिरणारे नागरिक कोरोनाच्या संसर्गाला प्रोत्साहन देत आहेत. निफाड तालुक्यातील छत्तीस गावांत कोरोनाने स्पर्श केला आहे ही बाब गंभीर आहे. 

अधिक वाचा :  देश कोरोना संकटाशी झुंजत असताना सरकार पाडण्याचे भाजपकडून उपद्व्याप- शिवसेना

कोरोनामुळे निफाड तालुक्यात आजवर अठरा बळी ‌गेले आहेत. त्यात पिंपळगांव बसवंत येथील चार, ओझर, पिंपळस, धारणगांव वीर शिवडी येथिल प्रत्येकी दोन तर चाटोरी, करंजगांव, शिरसगांव, विंचूर, रौळस, पिंप्री, कसबे, सुकेणे, येथील प्रत्येकी एक व्यक्ती कोरोनामुळे मृत्यू पावली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे अवाहन करण्यात येत आहे. 

कोविड सेंटर वाढवा 

निफाड तालुक्यात केवळ एकच कोविड केअर सेंटर लासलगांव येथे आहे. तर स्वॅब घेण्याचे केंद्र पिंपळगांव बसवंत येथे आहे. रुग्णसंख्येचा विचार करता निफाड तालुक्यात अजुन एक कोविड सेंटरसह स्वॅब घेण्याचे केंद्रही वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाचा अपवाद वगळता तालुक्यात इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्याही तक्रारी आहेत.