Tue, Jun 02, 2020 14:30होमपेज › Nashik › नाशिक : कांदा निर्यातबंदी विरोधात व्यापाऱ्यांची चांदवडला बैठक

नाशिक : कांदा निर्यातबंदी विरोधात व्यापाऱ्यांची चांदवडला बैठक

Published On: Sep 30 2019 4:00PM | Last Updated: Sep 30 2019 5:02PM

कांदाचांदवड : प्रतिनिधी

घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढल्याने केंद्र शासनाने कांदा व्यापाऱ्यांवर ५० टनापेक्षा जास्त कांदा साठा करून ठेऊ नये असे निर्बंध लादल्याने, या निर्णयाच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा असोसिएशनचे व्यापारी एकवटले आहेत. त्यांनी चांदवड शहरातील तुळसाई मंगल कार्यालय येथे सोमवार (दि.३०) रोजी दुपारी २.३० वाजता बैठक घेतली.

नाशिक जिल्‍ह्‍यातून कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावरून संतप्त प्रतिक्रिया

यासोबतच  आज लासलगांव येथील बाजार समितीत कांद्याचे दर ६०० रूपयांनी घसरले. कांद्याच्या आठ वाहनांचा लिलाव होताच बाजरभाव कमी झाल्याने लासलगांव बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले आहेत.

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावरून बागलाण तालुक्यातही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सोमवारी (दि.३०) रोजी येथील बाजार समिती लिलाव सुरू होताच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक होत कांदा लिलाव बंद पाडला. अकरा वाजल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी समितीच्या प्रवेशद्वारासमोर सटाणा- मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन ही केले.

 केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी उमराणे येथील बाजार समिती बंद करीत मुंबई आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूकडे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.