Tue, Aug 04, 2020 13:49होमपेज › Nashik › नाशिक : वाडा कोसळून एकाचा मृत्यू, तिघांना वाचवले (video)

नाशिक : वाडा कोसळून एकाचा मृत्यू, तिघांना वाचवले (video)

Last Updated: Jul 08 2020 8:59AM
नाशिक :  पुढारी ऑनलाईन

नाशिक जिल्हातील भद्रकाली परिसरात टॅक्सी स्टँड येथील बागुल नामक व्यक्तीचा वाडा बुधवारी (ता.८) पहाटे ४.३० च्या दरम्यान कोसळला. यात तिघांना अग्निशामक दलाच्या व पोलिसांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. परंतु यात अडकलेल्या एकाचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे. याबाबतची माहिती अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन शाम राऊत यांनी दिली.  

अधिक वाचा :  नाशिक जिल्ह्यात आणखी १९४ रुग्ण 

अग्निशामक दलाच्या कार्यालयात पहाटे फोन आल्यावर आम्ही काही वेळात पोहोचल्याचे राऊत यांनी सांगितले. शोधकार्य करत तिघांना सुखरूप बाहेर काढले. यात वाडा मालक सुनील दामू बागुल, सुनीता बागुल, भाडेकरी राजेंद्र खराटे आदींना बाहेर काढण्यात यश आले. परंतु राजेंद्र पांडुरंग बोरसे यांचा मुत्यू झाला आहे. घटनास्थळी भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस साजन सोनवणे आदी उपस्थित होते. घटनास्थळी पोलिस अधिक तपास करत आहेत.