Fri, Jun 05, 2020 19:07होमपेज › Nashik › लासलगावमध्ये गुंडांकडून तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न

लासलगावमध्ये गुंडांकडून तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न

Published On: Dec 27 2018 3:58PM | Last Updated: Dec 27 2018 3:58PM
लासलगाव :  वार्ताहर 

अवैध धंद्याच्या सूळसुळाटानंतर लासलगावमध्ये गँगवारने डोके वर काढले असून भर चौकत तलवारी आणि कोयते घेवून दहशत माजवत आहेत. यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. रात्रीच्या वेळी आता घराबाहेर पडणे कठिण झाल्याचे नागरिक बोलत आहेत. येथील शिवाजी चौकात बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास काही गुंडांनी चौकात शिवीगाळ करत कोयते आणि तलवार काढून दहशत माजवण्याचा प्रकार घडला.

यापूर्वी येथील बाजार तळामध्ये अशा अनेकदा घटना घडल्या आहेत. सायंकाळी बाजार तळामधून महिलांना जाणे कठीण झाले आहे. याच रस्त्यांमधून शाळा-कॉलेजमध्ये मुला-मुलींचा जाण्याचा मार्ग असल्याने पोलिस प्रशासनाने यामध्ये लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.

पुन्हा गँगवार
लासलगाव व परिसरात या टोळीपासून अनेकांना त्रास होत आहे. आता तर त्यांनी वाहनांची मोडतोड करण्याचा धडाका लावुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याआधीही १ फेब्रूवारी २०१६ रोजी अशाच प्रकारे अनेक वाहनांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये असाच प्रकार घडला होता. लासलगावमध्ये त्यांच्या वाढत चाललेल्या कारवाया पाहता पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.