Wed, Jul 08, 2020 18:42होमपेज › Nashik › नाशिक : दुचाकी-ट्रकच्‍या अपघातात बहीण ठार, भाऊ गंभीर  

नाशिक : दुचाकी-ट्रकच्‍या अपघातात बहीण ठार, भाऊ गंभीर  

Published On: Jan 17 2019 2:59PM | Last Updated: Jan 17 2019 2:59PM
पंचवटी : प्रतिनिधी 

बळी मंदिर चौफुली येथे दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाला. दुचाकी जत्रा हॉटेलकडून अमृतधामकडे जात होती. त्‍यावेळी ट्रकदेखील जत्रा हॉटेलकडून औरंगाबाद रोडकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघातात शुभांगी चंद्रशेखर खैरनार ( वय २७) हिचा मृत्‍यू झाला तर तिचा भाऊ प्रफुल्ल चंद्रशेखर खैरनार (२२) हा जखमी झाला आहे. 

जखमी प्रफुल्‍ल चंद्रशेखर खैरनार याला उपचार्‍यासाठी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्‍यात आले आहे. या अपघाताची अडगाव पोलिसात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. विशेष म्‍हणजे  गुरुवारी (ता. १७) सरक्षण मंत्री सुभाष भामरे यांचा  दौरा असल्‍याने  वाहतूक पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरीही हा अपघात झाला आहे.