Wed, Jun 03, 2020 20:34होमपेज › Nashik › तिहेरी तलाकचा नाशिकरोडला गुन्हा

तिहेरी तलाकचा नाशिकरोडला गुन्हा

Published On: Aug 31 2019 1:30AM | Last Updated: Aug 30 2019 11:24PM
चेहेेेडी : नोकरीला लागण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये आणावे. तसेच, घरात दागिने घालायचे नाही, माहेरच्या लोकांसोबत फोनवर बोलायचे नाही, लग्नामध्ये बुलेट आणि सोन्याची बिंदी दिली नाही अशा विविध कारणांनी महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत करत तिहेरी तलाक दिल्याची घटना घडली आहे. याबाबत पीडित महिलेने पती, सासू- सासरे आणि नणंद यांच्याविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार पीडित समरीयाल फैजान शेख (19, रा. स्टेशनवाडी, नाशिकरोड) हिचे 3 फेब्रुवारी 2019 रोजी पती फैजान मुख्यियार शेख (रा. फकिरवाडा, खुलताबाद, जि. औरंगाबाद) याच्यासोबत विवाह झाला होता. फैजान आणि त्याचे आई-वडिलांनी समरीयाल हीस घरात दागिने घालायचे नाही, माहेरच्या लोकांसोबत फोनवर बोलायचे नाही असे सांगत त्रास देणे सुरू केले. तसेच, लग्नामध्ये बुलेट आणि सोन्याची बिंदी दिली नाही म्हणून सतत टोमणे मारण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरू असतानाच काही दिवसांपासून एमएससीबी कंपनीत नोकरीला लागण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये घेवून येण्याचा तगादा लावला. त्यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. यातच 19 ऑगस्ट 2019 रोजी समरीयाल ही पतीसह माहेरी आली असता 20 ऑगस्टला दोघांमध्ये पुन्हा भांडण होवून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत फैजाने याने तीन वेळेस तलाक म्हणत निघून गेला. या बेकायेशीर तलाकविरोधात समरीयाल यांनी पती फैजान मुख्तियार शेख, सासरे मुख्तियार शेख, सासू हसिना शेख, नणंद हुमेरा जुबेर पठाण या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.