Tue, Nov 19, 2019 14:06होमपेज › Nashik › नाशिक रोड येथे हळदी समारंभात युवकाचा खून

नाशिक रोड येथे हळदी समारंभात युवकाचा खून

Published On: Jan 28 2019 11:47AM | Last Updated: Jan 28 2019 11:35AM
नाशिक रोड : वार्ताहर

नाशिक रोड येथील कॅनल रोडलगतच्या सामान्य वस्तीमध्ये हळदी समारंभ सुरू असताना रोहित राजू वाघ (वय 23) या युवकाचा खून करण्यात आला. खुनाचे कारण अद्याप समजलेले नसून उपनगर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

गायकवाड कुटुंबियांच्या हळदी समारंभात सदर घटना घडली असून रात्री साडेदहाच्या दरम्यान पोलिसांना समजल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यानंतर मृतदेह सिविल हॉस्पिटलला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 

रोहित वाघ हा माजी नगरसेवक सुनिल वाघ यांचा चुलत पुतण्या असून नाशिक रोड येथील सुभाष रोड येथे काही रिक्षावाल्यांनी रोहित वाघ राहत असलेला रस्ता दुचाकी आणि चारचाकीसाठी बंद ठेवला आहे. 

पुढील तपास उपनगर पोलिस करीत असून संशयितांना नाशिक रोड पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले आहे. रोहित वाघ नाशिक रोड रेल्वे पार्किंगच्या ठेक्यात कामाला होता. त्याचे काहीही पूर्ववैमनस्य नसल्याची गोष्ट येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. नाशिक रोड आणि सुभाष रोडवर शांतता पसरली आहे.