Thu, Aug 13, 2020 16:46होमपेज › Nashik › नाशिक रोड : बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी

नाशिक रोड : बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी

Last Updated: Jul 04 2020 9:13PM
नाशिक रोड : पुढारी वुत्तसेवा 

सामनगाव येथील बालकावर हल्लाच्या घटनेला आठ दिवस उटलत नाही तोवर मनपा हद्दीत बिबट्याने आठ वर्षाच्या बालकावर हल्ला करून जखमी केले. सदर बालकांला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. चेहेडी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या नागरिकांना दिसत आहे. 

अधिक वाचा :  नाशिक : आरोग्य पथकावर कोरोनाबाधिताचा हल्ला

शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजजवळ केशव बोराडे यांच्या घराजवळ बिबट्याने कुत्र्याला पळवले होते. यावेळी वनविभागाच्या अधिकारी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी पिंजरा दुसऱ्या ठिकाणी लावला होता. दरम्यान सायंकाळच्या वेळेस चेहेडी शिवारातील नेताजी सातपुते यांच्या घराबाहेर नातू आदित्य हा अंगणात खेळत असताना त्यावर बिबट्याने हल्ला केला. पंजाने पोटावर आणि पाटीला ओरखडल्याने आदित्यला जखमी केले. 

अधिक वाचा : विमानतळाजवळील इमारतींच्या उंची मर्यादित ठेवण्याचे आदेश रद्द

घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धुम ठोकली. जखमी बालकांला रुग्णालयात उपचारासाठी साठी दाखल करण्यात आले आहे. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी आदी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी बिबट्याला जेर बंद करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.