Sun, Jul 05, 2020 15:52होमपेज › Nashik › नाशिक : पोलिसांनी गॅस लिक होण्याच्या भितीने वाहतूक थांबविली

नाशिक : पोलिसांनी गॅस लिक होण्याच्या भितीने वाहतूक थांबविली

Published On: Sep 03 2019 12:17AM | Last Updated: Sep 03 2019 12:17AM
चांदवड (नाशिक) : प्रतिनिधी

चांदवड तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील राहुड घाटातुन चांदवड कडून मालेगाव कडे जाणा-या ट्रकने समोरील पीक अप व गॅस टँकरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात पीक अप मधील काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर चांदवडच्या उपजिल्हारुग्णालयात उपचार करण्यात आले.  दरम्यान ट्रकने गॅस टँकरला मागच्या बाजूने धडक दिल्याने टँकर मधील गॅस लीक होण्याची शक्यता आहे. गॅस गळतीमुळे कोणतीही  दुर्घटना घडु नये यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूने येणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. गॅस टँकर मधील गॅसची गळती होते आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी मनमाड येथील एक्सपर्ट टीम बोलवली असल्याचे पोलिसांनी सांगितले.