Tue, Jun 02, 2020 14:37होमपेज › Nashik › नाशिक : सावकारी जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या

नाशिक : सावकारी जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या

Published On: Aug 29 2019 5:21PM | Last Updated: Aug 30 2019 1:41AM

महेंद्र तुळशीराम पाटीलसिडको   :  प्रतिनिधी

कर्जबाजारीपणाला  व सावकाराच्या जाचाला कंटाळून सिडकोतील पाटील नगर परिसरात एकाने आत्महत्या केली. महेंद्र तुळशीराम पाटील (वय४९, रा.पाटीलनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संभाजी स्टेडियम जवळ बंद असलेल्या सेतू कार्यालयाच्या पायरीवर  महेंद्र यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. 

दरम्यान, त्यांची सुसाईड नोट सापडली आहे.  त्या नोटमध्ये काही सावकारांची नावे लिहिली आहेत. याप्रकरणी अंबड पोलिस तपास करीत आहे.