Fri, Jun 05, 2020 15:55
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नाशिक : अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने आईकडून मुलाचा खून

अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने आईकडून मुलाचा खून

Published On: Feb 26 2019 2:07PM | Last Updated: Feb 26 2019 2:07PM
नाशिक : प्रतिनिधी

चोपडा- तालुक्यातील चहार्डी येथील बारा वर्षीय बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने आईसह दोन संशयीतांनी खून केल्याची बाब उघड झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी आई गीताबाई दगडू पाटील (वय ३५),राजेंद्र पंढरीनाथ पाटील (वय ३७), समाधान उर्फ सभा विलास पाटील या  दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे.  संशयीतांनी घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या खदानीत विद्यार्थ्याची बॉडी फेकल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. 

सुरुवातीला नरबळीच्या संशयातून या विद्यार्थ्याचा खून झाल्याने तेवीस दिवसांपासून पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. मात्र गुन्ह्याचा उलगडा झाल्याने पोलिसांनाही दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी चोपडा पोलिस सकाळपासून मृतदेहाचा शोध घेत आहे.