Fri, Jun 05, 2020 05:54होमपेज › Nashik › नाशिक : तिसऱ्यांदा नेहरूनगर वसाहतीतील गाड्या जाळल्या

नाशिक : नेहरूनगर वसाहतीतील गाड्या जाळल्या

Published On: Mar 11 2019 3:47PM | Last Updated: Mar 11 2019 3:52PM
नाशिक : वार्ताहर

देशाची सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या प्रेस वसाहतीमध्ये तिसऱ्यांदा गाड्या जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नेहरू नगर वसाहत ही सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या ठिकाणी नोकरीला असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि कर्मचारी येथे राहतात. रविवारी (ता.१०) पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास नेहरूनगर वसाहतीमध्ये टाईप टू ए कोर्टर नंबर ३४७  या ठिकाणी जिन्यात लावलेल्या ड्रीम युगा  MH 50 जी ४८५ आणि हिरो होंडा शाइन सीजी ७ डब्ल्यू १८९० या गाड्यांना अज्ञात समाजकंटकांनी आग लावल्‍याची घटना घडली आहे. 

दोन्ही गाड्या पंचावन्न हजार रुपये किमतीच्या असून या सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. परिसरातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी दोन चारचाकी शासकीय वाहने जाळली होती. त्यानंतर चार महिन्यापूर्वी नऊ दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. यानंतर रविवारी (ता.१०)  दोन दुचाकीला अज्ञात समाजकंटकांनी आग लावलेली आहे.  यासंदर्भात पोलिस प्रशासनानडून कोणतेच पाऊल उचलण्‍यात आलेले नाही. 

देशाची सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या सीआयएसएफच्या परिसरात ही घटना घडल्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे, सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे. यापूर्वी नऊ वाहने जाळली होती.