Fri, Jul 10, 2020 08:11होमपेज › Nashik › नाशिक : सिन्नर घाटात कार-पिकअप अपघात

नाशिक : सिन्नर घाटात कार-पिकअप अपघात

Published On: Sep 26 2019 1:18PM | Last Updated: Sep 26 2019 12:44PM

नाशिक : सिन्नर घाटात कार-पिकअप अपघातनाशिक : प्रतिनिधी

सांगलीवरून सीन्नरमार्गे जव्हार येथे जात असताना पिकअपने कारला धडक दिल्‍याची घटना घडली आहे. या अपघातात कारमधील दोन महिलांसह एकजण जखमी झाला आहे. सकाळी  साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. 

प्रदीप देविदास बोर्डे हे आई, पत्नीसह ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे निघाले होते. रात्री प्रवासाला निघाल्याने सकाळी नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या सिन्नर घाटात  कारला पिकअपने धडक दिली. यात माया बोर्डे आणि अंजली बोर्डे यांच्यासह चालक प्रदीप बोर्डे हे जखमी झाले. यात महिलांना अधिक मार लागल्याने त्यांना उपचारासाठी तात्काळ हलविण्यात आले आहे. पिकअप चालक वाहनासह फरार झाला आहे.