Connection Error नाशिक : कांदा निर्यातबंदी विरोधात पिंपळगावला लिलाव बंद(video) | पुढारी 
Sun, Jul 12, 2020 19:08होमपेज › Nashik › नाशिक : कांदा निर्यातबंदी विरोधात पिंपळगावला लिलाव बंद(video)

नाशिक : कांदा निर्यातबंदी विरोधात पिंपळगावला लिलाव बंद(video)

Published On: Sep 30 2019 1:31PM | Last Updated: Sep 30 2019 1:37PM
पिंपळगाव बसवंत :  प्रतिनिधी

सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी (दि.29) कांदा निर्यातबंदी जाहीर केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद पाडले.

गत पंधरवड्यात कांद्याचे भाव वाढले होते. तर, घाऊक बाजारात कांदा 60 ते 70 रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री केला जात होता. त्यातच गत आठवड्यात केंद्र सरकाच्या कृषी व ग्राहक कल्याण विभागाच्या संचालकांसह अधिकार्‍यांच्या पथकाने जिल्ह्यातील बाजार समित्या, कांदा उत्पादक शेतकरी यांच्याशी भाववाढीसंदर्भात चर्चा केली. तसेच प्रत्यक्ष साठवलेल्या कांदा चाळीची पाहणी केली होती. त्यामुळे या पथकाला अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. 

हे पथक गेल्यानंतर तीन-चार दिवसातच कांद्याच्या सरासरी भावात 400 ते 500 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यातच ऐनसणासुदीच्या दिवसात सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तडकाफडकी कांदा निर्यातबंदीची घोषणा केली. या घोषणेमुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी सोमवारी येथील बाजार समितीतील लिलाव बंद पाडले. शेतकर्‍यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडकून टिका केली.