Tue, Nov 19, 2019 13:28होमपेज › Nashik › नाशिक : न्यू ग्रेस अकॅडमीच्या 74 मुलांना अंगाला अचानक खाज

नाशिक : न्यू ग्रेस अकॅडमीच्या 74 मुलांना अंगाला अचानक खाज

Published On: Aug 29 2019 5:29PM | Last Updated: Aug 30 2019 1:41AM

न्यू ग्रेस अकॅडमी या इंग्रजी माध्यमातील शाळेत विद्यार्थ्यांच्या अंगाला अचानक एकाच वेळी खाज सुटली. म्हसरूळ (नाशिक शहर) : वार्ताहर

येथील चामरलेणीचा पायथा परिसरातील एकतानगरमध्ये असलेल्या न्यू ग्रेस अकॅडमी या इंग्रजी माध्यमातील शाळेत विद्यार्थ्यांच्या अंगाला अचानक एकाच वेळी खाज सुटली. त्यामुळे त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर या मुलांना पुन्हा शाळेत पाठविण्यात आले. आज (दि. 29) दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली.

ही शाळा पहिली ते सातवीपर्यंत आहे. येथे सुमारे 450 मुले-मुली शिकतात. जेवणाच्या सुट्टीत काही मुले वर्गात, तर काही मुले आवारात होती. प्रथम एका मुलाने अंगाला खाज येत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांची संख्या वाढून 74 झाली. शाळा प्रशासनाने तत्काळ परिसरातील एका खाजगी हॉस्पिटलच्या त्वचारोग तज्ज्ञास पाचारण केले. नंतर या मुलांना शालेय बसमधून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून मुलांना परत शाळेत पाठविण्यात आले. 

मुलांच्या अंगाला खाज का सुटली? एकाचवेळी हा त्रास मुलांना का झाला? याविषयी उलट-सुलट चर्चा होती. काही मुलांनी आपल्याला किडे चावल्याने तर काही मुलांनी शाळेच्या वॉशरूममध्ये हात धुतल्याने हा त्रास झाल्याचे सांगितले. मात्र, या प्रकारात पालकांची धावपळ झाली. पण जेव्हा मुले तीन-चार तासांतच शालेय बसमधून मजेत आली. तेव्हा पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.