Fri, Jun 05, 2020 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नंदुरबार : गणपती विसर्जनवेळी एकाच गावातील सहा जणांचा बुडून मृत्यू 

नंदुरबार : गणपती विसर्जनवेळी एकाच गावातील सहा जणांचा बुडून मृत्यू 

Published On: Sep 06 2019 6:11PM | Last Updated: Sep 06 2019 5:58PM

घटनास्थळी नातेवाईकांनी केलेली गर्दीनंदुरबार :प्रतिनिधी  

गणपती विसर्जनासाठी नदीत गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने सहा तरुण बुडून मरण पावले. यामुळे शहादा तालुक्यातील वडछील गावावर शोककळा पसरली. सर्व मयत तरुण आणि किशोरवयीन मुलं हरदास समाजातील असल्याची प्राथमिक माहिती आली आहे.

याबाबत अधिक माहिती एक जण बुडत होता म्हणून त्याला वाचवताना हे बाकीचे सर्वच बुडाले. कैलास चित्रकथे, सचिन चित्रकथे,  विशाल चित्रकथे, दीपक चित्रकथे, रवींद्र चित्रकथे, सागर चित्रकथे अशी मृतांची नावे आहेत.

हे सहाजण हरदास समाजातील आहेत. यामुळे मृत्यू झाल्याने हरदास समाजावर आघात झाला आहे. दरम्यान, बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह काढण्यात आले असून प्रथम मसावद रुग्णालयात, नंतर शहादा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले. घटनास्थळी सर्व सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी धाव घेतली आहे पोलिसांकडून प्राथमिक नोंद घेणे चालू आहे.