Mon, Jul 06, 2020 23:23होमपेज › Nashik › जिल्हा शल्य चिकित्सकांवरील गुन्हा मागे घेण्यासाठी कर्मचार्‍यांचे आंदोलन

जिल्हा शल्य चिकित्सकांवरील गुन्हा मागे घेण्यासाठी कर्मचार्‍यांचे आंदोलन

Published On: Feb 07 2019 2:12PM | Last Updated: Feb 07 2019 3:46PM
नंदुरबार : प्रतिनिधी 

उत्तम व्यवस्थापन आणि सेवा विषयीचा पुरस्कार प्राप्त केलेल्या नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. भोये यांच्या विरोधात विनयभंगांची तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार एका महिला कर्मचाऱ्याने दिली आहे.

या प्रकरणाची चौकशी करून मग गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना, आज प्रकरणी तक्रारीवर आधारीत गुन्हा अखेरीस नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आदिवासी संघटना, डॉक्टर्स असोसिएशन, वैद्यकीय अधिकारी संघटना, परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय कर्मचारी संघटना यांनी ही तक्रार खोटी असल्याचे सांगत जाहीरपणे डॉ. भोये यांना पाठिंबा दिला आहे. तसेच त्‍यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून  पोलिस कारवाईचा निषेध नोंदवला.