Tue, Sep 22, 2020 10:35होमपेज › Nashik › नंदूरबार : रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे

नंदूरबार : रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे

Last Updated: Jun 29 2020 12:01PM

संग्रहित छायाचित्रनंदुरबार (नाशिक) : पुढारी व्रुत्तसेवा 

जिल्ह्यात १० व्यक्ती कोरोना संसर्गमुक्त झाल्या असतानाच नवीन ६ कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामुळे या शहरातील कंटेंमेंट झोन वाढून तीन वरून आठ करण्यात आले आहे. यासोबत शहरात सर्व्हे करण्याचा निर्णय घेवून जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटर वाढवणे सुरू केले आहे.

शहरातील कोकणी हिल येथील कोरोनाबधिताच्या कुटुंबातील ५ व्यक्तींना विलगीकरण कक्षात पाठविले असून संपर्कातील १२ व्यक्तीना होम क्वॉरंटाईन केले आहे. तसेच नंदुरबार शहरात वृंदावन कॉलनी व ग्रामीण भागात १, मौजे ढेकवद, कोकणी हिल (साईबाबानगर) २ याप्रमाणे नवीन ३ कंटेंमेंट झोन तयार करून बॅरिकेडिंग लावून औषध फवारणी करण्यात आली आहे.

वाचा : धुळ्यात २४ तासांत तब्बल १०७ कोरोनाबाधित 

तेथील नजिकच्या संपर्कातील १४ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह घोषित करून मुक्त करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या मंदाणे शहाद १, मनियार मोहल्ला- नंदुरबार १, काका शेठ गल्ली तळोदा १, मोठा माळीवाडा तळोदा ४, पोलिस स्टेशन मोलगी १, शिवराम नगर तळोदा १, लोणखेडा शहादा १ याप्रमाणे आहे.  

वाचा : कांदाचाळीत शिरलेला बिबट्या जेरबंद

जिल्ह्यातील कोरोना स्थिती एकंदरीत थोडक्यात अशी- नंदुरबार जिल्ह्यात एकूण घेतलेले नमूने १९५२, निगेटिव्ह अहवाल १७१८, पॉझिटिव्ह अहवाल १६३ (यापैकी ६ जणांचा मृत्यू), संसर्गमुक्त झालेले ७०, रुग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटीव्ह रुग्ण ८४, प्रलंबित अहवाल ५४, धुळे येथे उपचार २, नाशिक येथे ट्रान्स्फर १ याप्रमाणे आहे. 

 "