Fri, Jun 05, 2020 06:12होमपेज › Nashik › महायुतीने माझ्यावर अन्याय केला : विनायक मेटे

महायुतीने माझ्यावर अन्याय केला : विनायक मेटे

Published On: Jan 01 2019 11:52PM | Last Updated: Jan 01 2019 11:52PM
द्वारका : वार्ताहर 

राज्यात सहा पक्ष एकत्र येऊन महायुतीची स्थापना करुन राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आले. सहा घटक पक्षांपैकी पाच पक्षाचे कॅबिनेट व राज्य मंत्री झाले.  मात्र शिवसंग्राम पक्ष त्यात नसल्याने माझ्यावर अन्याय झाला असल्याचे प्रतिपादन शिवसंग्रामचे नेते व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटेंनी केले.  

छावा क्रांतीवीर सेना वर्धापन दिन व संस्थापक अध्यक्ष करण गायकर याच्या अभिष्टीचिंतन सोहळ्यात बोलत होते. यावेळी १००८ महामंडलेश्वर शांतिगिरी  महाराज, कामगार नेते अभिजीत राणे, शिवाजी सहाणे, नगरसेवक दिलीप दातीर, जगन पाटील, विजय वाहूळे आदी उपस्थित होते. 

मेटे पुढे म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी आम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. राणे समितीने  दिलेले आरक्षण चुकीचे असल्याचे सांगूनही निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण दिले.  ते न्यायालयात टिकले नाही, म्हणून आघाडी सोडली.  

माझा एकच पक्ष पदा पासून लांब असला तरी मी या सरकार सोबत आहे.  कारण  या सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीसाठी टिकेल असे आरक्षण दिले आहे. अण्णासाहेब महामंडळास निधी, अरबी समुद्रात शिवस्मारकाचे निर्मितीसाठी काम या सरकारने केल्याने सरकारचे अभिनंदन करतो.

मराठा समाज आज एकट पडला आहे. इतर सर्व समाज बांधव एकत्र येऊन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रगती करत आहेत. मराठा समाजाने मतभेद विसरुन  समाजासाठी एकत्र येऊन लढा द्यावा. आगामी लोकसभा व विधानसभा लढवणार असल्याचे मेटेंनी सांगितले. १००८ महामंडलेश्वर शांतिगिरी  महाराज यांनी गायकर यांना शुभ आशीर्वाद दिले. करण गायकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन संघटना काम करत आहे. मराठा आरक्षण, शेतकर्‍यांना सुकाणू समितीमार्फत कर्ज माफी,  केबीसी घोटळ्याचा पाठपुरावा, महिला आदींचे प्रश्न संघटना सोडवत आहे. आगामी लोकसभा महामंडेलश्वर शांतिगिरी महाराजांनी लढवावी. महाराजांचा आशीर्वाद घेऊन छावा क्रांतीवीर संघटना विजय श्रेणी ओढून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.  यावेळी राजकीय, सामाजिक,  शैक्षणिक, संघटनेचचे पदाधिकारी उपस्थित होते.