Fri, May 29, 2020 09:21होमपेज › Nashik › आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेट-स्टुडंट कौन्सिलवर राष्ट्रवादीचा झेंडा

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेट-स्टुडंट कौन्सिलवर राष्ट्रवादीचा झेंडा

Published On: Jan 19 2018 6:57PM | Last Updated: Jan 19 2018 6:57PMपंचवटी : वार्ताहर

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेट-स्टुडंट कौन्सिलवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व निमा स्टुडंट फोरम यांच्या सोबत झालेल्या निवडणुकीत सिनेटपदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मयूर सोनवणे, प्रतिक इंगळे, अभिषेक शिरसाठ यांची निवड झाली. तर, स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदी सागर बेनकी उपाध्यक्षपदी गौरी राणे व आशितोष बागडे यांची निवड झाली. सचिवपदी आकाश जयसिंगपुरे, सहसचिवपदी आकांक्षा कातकाडे व पूजा घोडके यांची निवड झाली. 

विजयी उमेदवारांचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील व आ. जयवंतराव जाधव,  शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह राष्‍ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंतदन केले.