Wed, Jun 03, 2020 21:35होमपेज › Nashik › गावितांच्या भ्रष्टाचार चौकशीसाठी मोर्चा

गावितांच्या भ्रष्टाचार चौकशीसाठी मोर्चा

Published On: Sep 23 2019 1:57AM | Last Updated: Sep 22 2019 11:06PM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार-संघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मिळून आदिवासी जलउपसा सिंचन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून मोठा भ्रष्टाचार केला आहे. या सर्व भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सोमवारी (दि.23) लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेने दिला आहे.

याबाबत एक प्रसिद्धिपत्रक काढण्यात आले असून, यामध्ये गावितांनी केलेल्या कामांची पोलखोल करण्यात आली आहे. प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या आदिवासी जलउपसा सिंचन योजनेचा कोट्यवधी रुपयांच्या केलेल्या घोटाळ्यातून माजी आमदार गावित यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे शेकडो एकर जमीन खरेदी केलेली आहे. 

सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रसिद्धिपत्रकावर जिल्हाध्यक्ष प्रवीण कडाळे, शहराध्यक्ष बबलू गांगुर्डे, जिल्हा सरचिटणीस देवा  वाटाणे, कोषाध्यक्ष शशिकांत मोरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सोमवारी दुपारी साडेबारा वाजता गोल्फ क्लब मैदान ते लाचलुचपत प्रतिबंधात्मक कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे.