Thu, Nov 14, 2019 17:11होमपेज › Nashik › महिलेचा विनयभंग

महिलेचा विनयभंग

Published On: Nov 09 2018 1:18PM | Last Updated: Nov 09 2018 1:18PMनंदुरबार : पुढारी ऑनलाईन 
गावात केलेल्या निकृष्ट गटार कामावरून वाद झाला असता शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग करण्याचा प्रकार आराळे तालुका नंदुरबार येथे घडला. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल गुरुवारी दुपारी दोन वाजता सरपंच महिला आणि रघुनाथ लोकेशन गिरासे यांच्यात गटार बांधकामावरून वाद झाला. त्यावेळी रघुनाथ गिरासे आणि अन्य तीन जण यांनी शिवीगाळ करीत धमकी देत ओढाताण करून विनयभंग केला, अशी फिर्याद महिलेने दाखल केल्यावरून रघुनाथ गिरासेंसह चार जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.