Fri, May 29, 2020 09:01होमपेज › Nashik › नाशिकरोड प्रेसचे आधुनिकीकरण

नाशिकरोड प्रेसचे आधुनिकीकरण

Published On: Aug 03 2019 1:14AM | Last Updated: Aug 03 2019 1:14AM
चेहेडी : वार्ताहर

नाशिकरोड चलार्थपत्र मुद्रणालय म्हणजेच करन्सी नोट प्रेसमध्ये आधुनिक मशीनरी बसविली जाणार आहे. त्यासाठी 1400 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात 350 कोटींची मशीनरी बसविली जाणार असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली.

350 कोटींच्या मशीन लाइनची ऑर्डर देण्यात आली आहे. दरम्यान, जगदीश गोडसे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबन घोलप, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी पंतप्रधानांची नवी दिल्लीत भेट घेऊन आभार मानले.
नाशिकरोड प्रेसमधील जुन्या मशीनरींमुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. वाढते ब्रेक डाउन, जुन्या मशीनरींचा अडथळा येत असतानाही मेहनती प्रेस कामगारांनी रिझर्व्ह बँकेच्या प्रेसशी स्पर्धा करून चांगले उत्पादन दिले आहे. दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या काळातही वर्षभर सुट्टी न घेता कामगारांनी अहोरात्र काम करून उत्पादन दिले होते. त्यामुळे नोटांची टंचाई कमी करण्यास मदत झाली. त्यानंतर जगदीश गोडसे, ज्ञानेश्‍वर जुंद्रे, सुनील आहिरे, राजेश टाकेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. 

 2012 पासून आधुनिकीकरणाची मागणी केली जात आहे. ऑफसेट प्रिंटिंग, बीपीएस न्यूमरोटा, इन्टॅग्लिओ प्रिंटिंग, नंबरिंग, फिनिशिंग या नवीन मशीनरी बसविल्या जाणार आहेत. सध्या प्रेसमध्ये दहा, वीस पन्नास, शंभर, दोनशे, पाचशेच्या नवीन डिझाइनच्या नोटा छापल्या जात आहेत.
- जगदीश गोडसे, 
सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ