Tue, Nov 19, 2019 05:02होमपेज › Nashik › जळगाव : अमळनेरात लाखोंचा गुटखा जप्त 

जळगाव : अमळनेरात लाखोंचा गुटखा जप्त 

Published On: Dec 23 2018 3:38PM | Last Updated: Dec 23 2018 3:39PM
जळगाव : प्रतिनिधी

अमळनेर शहरातील सिंधी कॉलनी भागात रविवारी जळगाव पोलिसांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. 

अमळनेर शहरातील सिधी कॉलनीत गुटख्याचा साठा असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षक शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशावरून रविवारी सकाळच्या सुमारास पोलिस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत श्याम वासवानी याच्याकडून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. 

जळगाव आरसीपीचे पथक या कारवाईत सहभागी झाले.  विशेष म्हणजे कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली तर स्थानिक पोलिसांनादेखील या कारवाईबाबत माहिती नसल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली.