Mon, Aug 10, 2020 05:26होमपेज › Nashik › नाशिक : पेठ तालुक्याला भूकंपाचा सौम्य धक्का

नाशिक : पेठ तालुक्याला भूकंपाचा सौम्य धक्का

Last Updated: Jul 10 2020 7:54PM

संग्रहित छायाचित्रपेठ : पुढारी वृत्तसेवा 

पेठसह तालुक्यातील अनेक गावांना आज (दि.१०) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. पेठसह तालुक्यातील अनेक गावातील नागरीकांनी भूकंपाचा सौम्य धक्का अनुभवला. 

सकाळी ११:०६ मिनिटांनी नाशिकपासून ४४ किमी अंतरावर २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद मेरी येथील उपकरणे संशोधन विभागाच्या भूकंप आधार सामग्री पृथ्थकरण कक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली. 

मेरी केंद्रातून माहिती देण्यास विलंब 

मेरी येथील कार्यालयात भूकंपाची नोंद होत असते. या कार्यालयातून माहिती देण्यास मोठा विलंब होत असून भूकंपाच्या केंद्रबिंदूची स्पष्टता होत नसल्याने स्थानिक प्रशासनही आज दिवसभर गोंधळात होते.