Mon, Aug 10, 2020 04:56होमपेज › Nashik › मौजमजेसाठी मॅकेनिकलचा विद्यार्थी बनला चोर!

मौजमजेसाठी मॅकेनिकलचा विद्यार्थी बनला चोर!

Published On: Dec 14 2017 4:43PM | Last Updated: Dec 14 2017 4:43PM

बुकमार्क करा

पंचवटी : वार्ताहर 

सटाणा येथून मॅकेनिकलचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याने तीन मोटारसायकल चोरी केल्याचे उघड झाले आहे. याच विद्यार्थ्याने यापूर्वी आपली मौजमजा आणि चैनीचे राहणीमान पूर्ण करण्यासाठी थेट प्रशिक्षणाथीं डॉक्टरांचे मोबाईल चोरल्याचे निष्पन्न झाले होते. 

गौरव प्रकाश खैरनार (रा़ मातृदर्शन सोसायटी, आडगाव, मूळ रा़ सटाणा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो केके वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकलच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत आहे. तसेच गौरव याचे आई वडील सटाणा येथे शिक्षक असल्याचे देखील समजते. दिड महिन्यापूर्वी त्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहातील तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरून नेले होते. त्यावेळी आडगाव पोलिसांनी संशयित खैरनार यास अटक करून त्याची अधिक चौकशी केली. त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली होती तसेच त्याच्या ताब्यातून एक मोटारसायकल देखील ताब्यात घेतली होती.

मात्र, गौरव हा फरार झाल्याने पोलिसांना सापडत नव्हता. आडगाव पोलिसांनी गौरवच्या मित्रांवर लक्ष ठेवले. गौरव त्यांना भेटण्यासाठी आला असता बुधवार (दि.१३) रोजी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आडगाव, पंचवटी आणि मालेगाव येथून होंडा शाईन, काळ्या रंगाची पल्सर आणि हिरो होंडा अशा एकूण एक लाख १० हजार रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे . त्याच्याकडून तीनही मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या असून पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहे.